सांघिक कामगिरीचा विजय!

           नुकतीच पार पडलेली ‘क्रिकेट वर्ल्डकप चॅम्पियन ट्राॅफी‘ भारताने तीनवेळा जिकून इतिहास घडविला. त्याबद्दल ह्या भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यापूर्वी ‘२०२३ वर्ल्डकप‘ भारत फायनलला येऊन हरला त्याबद्दल दुःख वाटते. त्याचं काय झालं ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती‘ असो. क्रिकेटमध्ये हार-जीत ही असतेच. त्याबद्दल वाईट वाटत नाही.

    परंतु, यावेळी ‘चॅम्पियन ट्राॅफी‘ जिकलेल्या भारतीय खेळाडूंचे कौतुक करावेसे वाटते. ज्याप्रमाणे फलंदाज व गोलंदाज यांनी चांगल्याप्रकारे कामगिरी केली, त्यांना सलाम करावासा वाटतो. रोहित शर्माची मॅच विनींग कॅप्टनशीप ही पण एक जमेची बाजू आहे. महेंद्रसिग धोणी ज्याप्रमाणे कॅप्टनशीप करायचा व मॅच जिकून द्यायचा. त्याची चुणूक रोहित शर्मामध्ये दिसून आली. बरं, वाटलं कॅप्टनशीप बघून. (अचूक फिल्डिग व योग्य ठिकाणी योग्य गोलंदाज वापरण्याची किमया अप्रतिम होती.)

    ओपनर रोहित शर्मा व शुभमन गील यांची सुरूवात तसेच विराट कोहलीची पाकिस्तानबरोबरची शतकी खेळी, सातत्याने मॅच विनिग पारी खेळणारा श्रेयस अय्यर माझ्या मते नंबर वन ठरला. त्याला अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, के.एल.राहूल व सर रविद्र जडेजाने दिलेली साथ अप्रतिम होती. त्याल तोड नाही. महंम्मद शमीने मोक्याच्या ठिकाणी काढलेले विकेट ही पण एक जमेची बाजू होती.

    पूर्वी कधी पाहिलेली नव्हती ती वरूण चक्रवर्तीची घातक स्पीन गोलंदाजी व त्याला अक्षर पटेल, सर रविद्र जडेजाने व चायना मन गोलंदाज कुलदिप यादव यांची साथ ह्यांच पण कौतुक करावं तेवढं कमीच. न्युझिलंड बरोबरची ती फायनल मॅचमध्ये चायनामन गोलंदाज कुलदिप यादव याने ‘रचित रविद्र‘चा उडवलेला त्रिफळा व लगेच त्यांचा स्टार नंबर वन फलंदाज ‘केन विल्यमसन‘ची कॉट अॅण्ड बोल्डची विकेट  अफलातून होती. केन विल्यमसन लगेच आऊट झाला ते बघून मला हसूच आलं. त्याला पण वाटलं नसेल की मी असा सहजासहजी आऊट होईन म्हणून. तोच मॅच विनिगचा टर्निग पॉईंट होता व त्याच्या हातातून मॅच गेली आणि मी म्हटलं आता विजय शंभर टक्के आपलाच आहे आणि तसचं घडलं. भारताने ‘चॅम्पियन ट्राॅफी‘ जिकली.

     या पूर्ण सिरीजमध्ये अकराही खेळाडूंकडून चांगली कामगिरी झाली. कोणीही कुठेही कमी पडला नाही. म्हणून म्हणतात क्रिकेट हा एकट्यादुकट्याचा खेळ नाही. हे पुन्हा एकदा भारतीय खेळाडूने दाखवून दिले. नाहीतर रोहित शर्मा किवा विराट कोहली आऊट झाला की, पुढे काय होणार? परंतु, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल व सर जडेजाने चोख कामगिरी बजावली व भारताला ‘‘चॅम्पियन ट्राॅफी‘‘ मिळवून देण्यात सिहाचा वाटा उचलला. त्याबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

अॅन्थोनी फर्नांडिस, दाभोसवाडा-वेंगुर्ला

मोबा. ९७६६५३६२७२

Leave a Reply

Close Menu