प्रा. नारायण गिरप यांना जनहितचा आदर्श पत्रकार पुरस्कार

मूळचे वेंगुर्ला-गिरपवाडा येथील सध्या मुंबईस्थित असलेले प्राध्यापक तसेच ज्येष्ठ पत्रकार नारायण गिरप यांना जनहित फाऊंडेशनमहाराष्ट्र २०२५चा आदर्श पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

      प्रामाणिक आणि निःस्वार्थी भावनेने आजपर्यंत समाजाची केलेली सेवा आणि कार्याची दखल घेऊन श्री. गिरप यांना पुरस्कार जाहीर झाला होता. २८ एप्रिल रोजी दादर येथे जनहित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश जामसंडेकर व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवलेसुप्रसिद्ध गायिकासंगीत-नाट्य लेखिका मधुवंती पेठेनिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी अजित देशमुख यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराबद्दल श्री. गिरप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu