भारतीय सेनेने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन ‘सिंदूर‘ मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले. दरम्यान, वेंगुर्ला तालुका भाजपातर्फे भारतीय सेनेच्या या कामगिरीचा तसेच विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.