वेंगुर्ल्यातील सुंदर शाळांचा सन्मान

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्र.१ (२०२३-२०२४) व टप्पा क्र.२ (२०२४-२०२५) अंतर्गत शासनस्तर आयोजित स्पर्धेत तालुक्यातील क्रमांक प्राप्त शाळांचा वेंगुर्ला पं.स.सभागृह येथे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह, पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. टप्पा क्र.१ अंतर्गत प्राथमिक स्तरामध्ये प्रथम-मठ नं.२, द्वितीय-वेतोरे नं.१, तृतीय-मातोंड मिरिस्ते यांचा तर माध्यमिक स्तरामध्ये प्रथम-गुरूवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय-शिरोडा, द्वितीय-वेंगुर्ला हायस्कूल, तृतीय-अण्णासाहेब देसाई विद्या.-परूळे यांचा तसेच टप्पा क्र.२ अंतर्गत प्राथमिक स्तरामध्ये प्रथम-केंद्रशाळा वेतोरे नं.१, द्वितीय-वजराट नं.१, तृतीय-आरवली नं.१ यांचा तर माध्यमिक स्तरामध्ये प्रथम- अण्णासाहेब देसाई विद्या.परूळे, द्वितीय-श्री शिवाजी हायस्कूल-तुळस, तृतीय-डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल-मठ यांचा समावेश आहे. टप्पा क्र.२मध्ये मठ नं.२ ने गुणानुक्रमे तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. या शाळेने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तीन लाखांचे बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला. शासनामार्फत बक्षिसपात्र शाळांना अनुक्रमे ३ लाख, २ लाख व १ लाख रूपये पारितोषिक देण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी सखाराम सावंत, बालविकास प्रकल्प अधिकारी शर्मिष्ठा सामंत, विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, केंद्रप्रमुख लवू चव्हाण, महादेव आव्हाड, मुख्याध्यापक सचिन माने, केंद्रप्रमुख विठ्ठल तुळसकर आदी तसेच केंद्रप्रमुख, बक्षिसपात्र शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संघटना प्रतिनिधी, शा.व्य.समिती पदाधिकारी, शिक्षक, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद टिळवे यांनी तर श्री.कदम यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu