स्वामी विवेकानंदांच्या वेंगुर्ला भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जतन व्हाव्यात आणि येणा-या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘आम्ही आनंदायात्री‘तर्फे वेंगुर्ला येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक व्हावे, अशी विनंती करणारे निवेदन रविद्र चव्हाण यांच्याकडे सादर केले होते. त्याला प्रतिसाद देऊन, दूरदृष्टीने सामाजिक जाणीव लक्षात घेऊन स्वामी विवेकानंद हॉल उभारण्यासाठी पुढाकार घेऊन तो प्रत्यक्षदर्शी पूर्ण झाला. त्याबद्दल आनंदयात्रीतर्फे रविद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. आज हा हॉल केवळ एक वास्तू नाही, तर तो विवेकानंदांच्या विचारांची, राष्ट्रनिष्ठेची आणि युवा प्रेरणेची जीवंत खूण ठरेल हे निश्चित आहे. हा हॉल केवळ सांस्कृतिक किवा सामाजिक उपक्रमांसाठीच नव्हे, तर विवेकानंदांच्या विचारंचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक प्रभावी मंत्र म्हणून कार्य करेल, याबद्दल आम्ही निश्चित आहोत. आपल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपण दाखविलेल्या संवेदनशिलतेबद्दल आणि वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल ‘आनंदयात्री‘ परिवार आपले मनःपूर्वक आभार मानत असल्याचे कृतज्ञता पत्रही श्री.चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी आनंदयात्रीचे वदा कांबळी, डॉ.प्रा.सचिन परूळकर, महेश राऊळ, पांडुरंग कौलापूरे, विद्या कौलापूरे, चारूता दळवी, चैतन्य दळवी, जान्हवी कांबळी, पी.के.कुबल, शशांक मराठे, सीमा मराठे, विशाखा वेंगुर्लेकर, प्रितम ओगले, प्रसन्ना देसाई उपस्थित होते. त्यानंतर हॉलमध्ये स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलची माहिती देणा-या पोस्टर प्रदर्शनाची पहाणी श्री. चव्हाण यांनी केली.