सिधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत हते. परंतु, त्या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. ज्यानुसार आमदार राणे यांनी गेल्या अधिवेशनात दशावतारी कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर २६ मे रोजी आमदार राणे यांच्या पुढाकाराने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक घेण्यात आली.
यावेळी सिधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी नोंद व्हावी, कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाची मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी, सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घ्यावे तसेच वृद्ध कलाकारांना मिळणाया मानधनामध्ये सुद्धा दशावतारी कलाकारांना अधिकचा वाटा मिळावा अशा मागण्या मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केल्या. यावेळी दत्तप्रसाद शेणई, पुरूषोत्तम कोचरेकर, रूपेश नेवगी, आशिष गावडे, राजाराम धुरी, विश्राम धुरी, दादा साईल, देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते.