बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर म्हणून विजय तुळसकर सन्मानित

   कोकणचा आईनस्टाईन म्हणून ओळखला जाणारा, भारतीय संगीत आणि ज्ञान यामध्ये दैवी गुणवत्ता प्राप्त असलेला तुळस गावचा सुपुत्र विजय तुळसकर याला शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्या पुणे येथील सुप्रसिद्ध गांधर्व महाविद्यालयाचा बेस्ट स्टूडंट ऑफ दी इयर हा सन्मान प्राप्त झाला असून या महाविद्यालयाच्या वतीने विख्यात हार्मोनियम पंडित व या महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांच्या हस्ते हार्मोनियम‍ भेट म्हणून देऊन विजय याला गौरविण्यात आले. विजय या महाविद्यालयात शास्त्रीय हार्मोनियम वादनाचे धडे गिरवत असून आता तो हार्मोनियमच्या चौथ्या ग्रेडची परीक्षा देण्यासाठी सज्ज झाला आहे.

      विजय मुंबईतील सावली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भारतीय संगीत शास्त्राचे शिक्षण देणाऱ्या पुणे येथील गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विख्यात हार्मोनियम वादक पंडित प्रमोद मराठे यांना भेटला. मराठे यांनी विजयमधील हार्मोनियम वादनाची असामान्य गुणवत्ता ओळखून त्याला गांधर्व महाविद्यालयात हार्मोनियम शिक्षणासाठी प्रदेश दिला होता. विद्यालयाने त्याला या संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली. अवघ्या आठ महिन्यांत त्याने हार्मोनियम वादनात विशेष प्राविण्य मिळवत हा सन्मान मिळविला. त्याला महाविद्यालयातर्फे हार्मोनियम देऊन गौरविण्यातही आले. विजय आता इयत्ता आठवीत प्रवेश करणार आहे. कमी वयात गांधर्व महाविद्यालयाचा बेस्ट स्टूडंट सन्मान मिळवणारा तो पहिलाच विद्याथ ठरला आहे.

      सावंतवाडी येथील संगीत शिक्षक नीलेश मेस्त्री यांच्याकडे विजय शास्त्रीय गायनाचे धडे गिरवत आहे. त्याच्या बहिणी जागृती आणि कस्तुरी यादेखील शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही संगिताची उपासना करणाऱ्या या मुलाचं आणि त्याच्या पालकांचे कौतुक करावं तेवढ थोडंच आहे.

      विजयने वेस्टर्न संगितामध्येही प्रभुत्व मिळवलं आहे. वयाच्या दहाव्या वषपासून तो पियानो वादनाचा अभ्यास करीत आहे. नऊ ते दहा वर्षे अभ्यास करावा लागतो ती परीक्षा विजय अवघ्या तीन वर्षातच देत आहे. कला अकादमी कुडाळ येथे अजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तो पियानो वादनाचे धडे गिरवत आहे. त्रिनेटी कॉलेज ऑफ लंडन या कॉलेजमार्फत या वेस्टर्न म्युझिकच्या परीक्षा घेतल्या जातात. विजयने पियानो वादनाच्या दिलेल्या परीक्षांमध्येही डिस्टिंक्शन मिळविले आहे.

Leave a Reply

Close Menu