मठ गावातील चाळीस घरांना धोका निर्माण

गेले आठ दिवस सतत पडणारा पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यातील मठ सातेरी मंदिरकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील ४० घरांना अतिवृष्टीत धोका  निर्माण झाला आहे. परिणामी, येथील रूग्णांना रूग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे. तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावर कसरत करत शाळेत जावे लागणार आहे. त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीने शासनाने रस्ता करावा अशी मागणी जोर धरत आहे. निवडणुका आल्या की राजकीय लोक येऊन रस्ता करण्याचे आश्वासन देतात मात्र निवडणूक कालावधी निघून गेला की समस्यांकडे दुर्लक्ष करतात. तर काही मंजूर रस्ते असतानाही केले नसल्याने ग्रामस्थांतून शासनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu