कोकणातील दशावतार कला ही प्रसिद्ध आहे. आजपर्यंत यात पुरूषच भूमिका साकारत असे. परंतु, आता मुलींनीही यात सहभाग घेत एक नवीन पायंडा पाडला आहे. वेंगुर्ला येथील शाळा नं.४च्या आजी-माजी विद्यार्थीनींनी ‘कृष्ण-हनुमान युद्ध‘ आणि ‘रामदर्शन‘ आदी नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून आपल्यातील दशावतारी कला जागृत केली.
शहरातील श्री धोकमेश्वर देवस्थान येथे ‘कृष्ण-हनुमान युद्ध‘ तर आणि श्री रामेश्वर मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांवेळी ‘रामदर्शन‘ हे नाट्यप्रयोग सादर केले. दोन्ही नाटकांमध्ये मृण्मयी परब, चिन्मयी परब, पार्थवी परब, वरदा परब, श्रेया किनळेकर, युक्ता किनळेकर, धनश्री किनळेकर, धनश्री जाधव आणि हंसिका वजराटकर आदी मुलींनी भूमिका साकारल्या. दोन्ही नाट्यप्रयोगांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या मुलींना शिक्षक संतोष परब, सीताराम नाईक, ज्येष्ठ दशावतारी कलाकार शेखर माडकर यांच्यासह मुलींच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले.