वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून शासनाच्या निधीतून शहरात साकारलेल्या स्वामी विवेकांनद कौशल्य विकास लॅब, कॉन्फरन्स हॉल, कॅम्प येथील अग्निशमन स्टेशन, चार्जिग स्टेशन अशा चार कामांचा लोकार्पण सोहळा भाजपाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण जगाला हिदू धर्माची ताकद दाखवून देणारे स्वामी विवेकानंद हे उत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्या विचारांचे आचरण होण्यासाठी त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहेत असे बोलताना रविद्र चव्हाण म्हणाले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.