वेंगुर्ला येथील प्रज्ञा परब यांनी गेली ३५ ते ४० वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय कार्य केले आहे. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी काथ्या कारखान्याची निर्मिती केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन बयाच पुरस्कारांसोबत महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या मानवतेच्या कामाचे अनुकरण करत कार्य करीत आहेत. त्याबद्दल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नेतृत्व, कर्तुत्व, दातृत्व आणि मातृत्व या चारही विषयात अहिल्यादेवी अलौकिक ठरल्या. त्या एक शुद्ध मनाच्या, सात्विक विचारांच्या आदर्श राज्यकर्त्या होत्या, असे प्रज्ञा परब यांनी स्पष्ट केले. सत्कारप्रसंगी भाजपाचे प्रसन्ना देसाई, पपू परब, मनवेल फर्नांडिस, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, प्रणाली खानोलकर, समिधा कुडाळकर, हसिनाबेन मकानदार आदी उपस्थित होते.