महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई व सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्गच्यावतीने आणि स्वाभिमानी कामगार संघ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित असलेल्या ५०० पैकी ४१२ नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी अत्यावश्यक वस्तू व संच वितरण कार्यक्रम वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहात ३१ मे रोजी पार पडला. यावेळी सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, न.प.चे प्रशासकिय अधिकारी संगीता कुबल, शिवसेनेचे वेंगुर्ला शहरप्रमुख उमेश येरम, माजी सरकारी अधिकारी किरण कुबल, शिवसेनेचे युवक शहरप्रमुख सागर गावडे, पदाधिकारी प्रतिक खानोलकर, सोमा मेस्त्री, सौ.बागकर आदी उपस्थित होते.