आंतरराष्ट्रीय सागरदिनी स्वच्छता मोहिम

आंतरराष्ट्रीय सागरी दिनाचे औचित्य साधून उभादांडा येथील श्री क्षेत्र सागरेश्वर किना-­याची स्वच्छता करण्यात आली. यात विविध प्रकारचा सुमारे ५०० किलो कच­याचे संकलन केले. ही स्वच्छता मोहिम कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग, महाराष्ट्र जीन बँक, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ-नागपूर यांच्यावतीने  ८ जून रोजी राबविण्यात आली.

     या मोहिमेत कॅप्टन डॉ.एस.टी.आवटे, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, ग्रामपंचायत सदस्य गोविद परूळेकर, गणेश चेंदवणकर, अस्मिता मेस्त्री, अंकिता केरकरग्रामपंचायत कर्मचारी सुशिल रेडकर, राजू मयेकर, विठोबा परब यांच्यासह स्थानिक मच्छीमार आणि विद्यार्थी असे एकूण ५४ जणांनी सहभाग घेतला. प्रा.डॉ.नानासाहेब कांबळे यांनी सागरी मत्स्य जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. स्वच्छता मोहिमेत काचेच्या व प्लास्टिक बॉटल, चमचे, पिशव्या, तुटलेली जाळी, दोरीचे तुकडे, थर्माकोल आदी वस्तू गोळा करण्यात आल्या.

Leave a Reply

Close Menu