वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर क्रिकेटसह अन्य मैदानी स्पर्धा हत असतात. मात्र, मैदानावर झाडांच्या सावली अभावी खेळाडूंना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मैदानाच्या सभोवताली वृक्ष लागवड केल्यास त्याचा फायदा खेळाडूंना होणार आहे. संबंधित वृक्ष लागवड करण्यासाठी नगरपरिषदेने आम्हाला परवानगी द्यावी आणि सहकार्य करावे अशाप्रकारचे निवेदन सचिन वालावलकर मित्रमंडळातर्फे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष परब, उपाध्यक्ष अॅड.मनिष सातार्डेकर, सदस्य भूषण माडकर, बाळा आरावंदेकर, प्रशांत सावंत, जयेश गावडे आदी उपस्थित होते.