साबळेंच्या कारवाईबाबत जल्लोष

सांगली-मिरज महानगरपालिकेचे उपयुक्त वैभव साबळे यांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली. त्यांच्यावर शहरातील २४ मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच मागून ७ लाखांवर तडजोड केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या कारवाईचे पडसाद वेंगुर्ला शहरातही उमटले आहेत. वेंगुर्ला शहरात काही नागरिक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून या कारवाईचे अभिनंदन केले. वैभव साबळे यांनी वेंगुर्ल शहरात मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी त्यांनी शहरातील नागरिक, व्यापारी यांना प्रचंड त्रास दिल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला.

Leave a Reply

Close Menu