हिदुधर्माभिमानींतर्फे शिवराज्यभिषेक दिन साजरा

  हिदुधर्माभिमानी मंडळींच्यावतीने वेंगुर्ला – माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवप्रार्थना म्हणुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

     यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले. तसेच कु.शिवानी खानोलकर हिने शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व विषद केले. हिदू साम्राज्यदिनाची महती सांगताना बाबुराव खवणेकर म्हणाले की, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ६ जून १९७४ या दिवशी जगामध्ये एक अघटीत घटना घडली ती म्हणजे हिदवी स्वराज्य संस्थापक सार्वभौम राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पंडित गागा भट्टच्या हस्ते राज्याभिषेख अद्भुत, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रयतेचा राजा छत्रपती झाला. अठरापगड जातीतील सर्व सामान्य घरातील तरूणांना संघटित करून हिंदूंचा राजा होऊ शकतो हे जगाला दाखवून दिले. अनेक देश त्यांच्या धोरणांचा, नितींचा  अभ्यास करीत आहेत. केवळ राज्याभिषेक नाही तर हिदू संस्कृतीप्रमाणे सर्व व्यवस्थाच निर्माण केली. स्वतःच्या नावाने शक सुरू केले. चलन व्यवहारात आणले. सामान्य शेतक-यांचा विचार करून कर प्रणाली चालू केली. पारशी शब्दांऐवजी संस्कृत प्रचुर मराठी शब्द व्यवहारात आणले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसामध्ये हे राज्य आमचे आहे असा विश्वास निर्माण केला. पानिपतच्या लढाईत मिळालेले अपयश विचारात घेतले. पृथ्वीराज चव्हाण ने महम्मद घोरीला सतरा वेळा जीवदान दिले त्याचा परिणाम विचारात घेतला आणि आपण कसा विचार करायला पाहिजे हे जनतेला दाखवून दिले. केवळ राज्याभिषेख नाही तर राजाने जनतेचा विचार कसा करायला पाहिजे याची संपूर्ण व्यवस्थाच निर्माण केली. म्हणून तर ४०० वर्षांनंतरही या राजाचा जयजयकार तितक्याच प्रेरणेने आपण करतो. शिवराज्याभिषेकाने आपल्याला हेच दान दिलेले आहे.

     यानंतर उपस्थित हिंदुधर्माभिमानी मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला.

 

Leave a Reply

Close Menu