आरवली पुलाचे बांधकाम सार्वजनिक खात्याकडून पूर्ण

आरवली वेतोबा देवस्थान समोरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वेंगुर्ला आरवली मार्गे शिरोडा प्रवास सर्वच वाहनांसाठी पर्यायी मार्गाने करावा लागत होता. अखेर पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने सोमवार दि. १६ जून पासून सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल दोन महिने लागले.

      आरवली वेतोबा मंदिर समोरील पुलाचे बांधकाम १५ एप्रिलपासून चालू करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामावेळी या ठिकाणी पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आला होता. पण २० मे पासून जोरदार मान्सुनपुर्व पाऊस आला. त्यामुळे पर्यायी मार्गच वाहून गेला. त्यामुळे दि. २२ मे पासून सर्व प्रकारची ये-जा करणारी वाहातुक ही वेगळ्या मार्गाने व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने टांक-आसोली-सोन्सुरे मार्गे शिरोडा अशी जाण्यासाठी तर शिरोडाहून येण्यासाठी शिरोडा-वेळागर-सागरतीर्थ मार्गे टांक हायस्कूल ते वेंगुर्ला अशी मागणी तहसिलदार यांचेकडे लेखी पत्रव्यवहारातून करण्यात आली. त्यानुसार तहसिलदार यांनीसर्व प्रकारच्या वाहनधारकांना कळण्यासाठी नोटीस बोर्डवर तशा सुचना तर प्रवासी एस.टी. बस गाड्यांसाठी आगार व्यवस्थापकांना पत्रे देण्यात आली होती. पुलाचे काम जलद व्हावे व पुल लवकरात लवकर प्रवासासाठी खुला करावा यासाठी माजी सरपंच मयूर आरोलकर व पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. अखेर या पुलाचे बांधकाम १५ जून रोजी पुर्ण झाल्याने तो सर्व पकारच्या वाहनांच्या वाहातुकीस योग्य असल्याचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ल्याचे सहाय्यक उपअभियंता आश्लेष शिंदे यांनी लेखी पत्र वेंगुर्ल तहसिलदार यांना तसेच पोलीस निरीक्षक आणि वेंगुर्ला आगार व्यवस्थापक यांना देत या पुलावरून वहातुक सुरू करण्याचे स्पष्ट केले.

    त्यानुसार नवीन पुलावर पुरोहित बाळा आपटे यांचेमार्फत स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. यावेळी संजय आरोलकरमयूर आरोलकरपोलीस पाटील मधुसुदन मेस्त्रीश्रीपाद गुरवसतीश येसजीदिलीप पणशीकरएकनाथ जोशीकुणाल दळवीसचिन येसजीकृष्णा सावंत,  रंगनाथ सोन्सुरकरसुशील भेरेनंदा पेडणेकर, ठेकेदार विनय राणेमयुरा राणेप्रविण आरोलकरकृष्णा येसजीविष्णू सावंतस्वप्नील येसजीअक्षय येसजीगौरव येसजीसुहास गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu