माधवी घोगळे यांना ‘जिजाऊ पुरस्कार २०२५‘ प्रदान

कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना कठीण प्रसंगी हतबल न होता आपल्या मुलांना उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेल्या तुळस येथील सौ. माधवी घोगळे या महिलेला सिधुदुर्ग भाजपाच्यावतीने ‘जिजाऊ पुरस्कार २०२५‘ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शालश्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

      माधवी घोगळे यांना दोन मुले असून मुलगा शिवम याने मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. सध्या त्याची कुडाळ आणि सावंतवाडी मॅरेथॉन स्पर्धेसाठी ‘ब्रॅण्डअॅम्बॅसिडर‘ म्हणून निवड केली आहे. तसेच त्यांची कन्या जान्हवी हिने मास कम्युनिकेशनपत्रकारितावृत्तपत्रसंपादनडिजीटल मिडियासार्वजनिक संवाद या क्षेत्रात काम केले आहे. तसेच इंग्रजी साहित्य विषयातही पदवी प्राप्त केली आहे. सौ. माधवी घोगळे यांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देऊन मुलांना घडविण्याचे काम केले आहे. सौ. घोगळे यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपातर्फे पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तुळस सरपंच रश्मी परबउपसरपंच सचिन नाईकग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकरमाजी सरपंच शंकर घारे व विजय रेडकरअणसूर सरपंच सत्यविजय गावडेवेताळ प्रतिष्ठानचे सचिन परूळकरआनंदयात्रीचे अजित राऊळभाजपाचे प्रसन्ना देसाईसाईप्रसाद नाईकमनवेल फर्नांडिससुहास गवंडळकरसुजाता पडवळदादा केळुसकरवृंदा गवंडळकरआकांक्षा परबरामू परबवैभव होडावडेकरसंतोष शेटकरप्रमोद गोळकविनय गोरेसचिन नाईकसत्यवान पालव आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu