राजवाडा निवासी मुंबई मित्रमंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वेंगुर्ला-राजवाडा निवासी, मुंबई मित्रमंडळ यांचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ दि. २२ जून रोजी भावसार हॉल, परेल येथे उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, प्रमुख पाहुणे जिदाल कंपनीचे माजी संचालक पुष्कराज कोले, माजी शासकीय अधिकारी किरण कुबल, मंडळाचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष सचिन कुबल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. मंडळातर्फे दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष सचिन कुबल यांनी मंडळाची स्थापना व वाटचाल यावर माहिती दिली. मंडळाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार, पहिली ते पदवी गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच माहेरवाशीणींचा सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

    परशुराम उपरकर, पुष्कराज कोले, किरण कुबल व सचिन कुबल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळाचे कार्य यापुढेही जोमाने चालवणार असल्याचे मंडळाच्या पदाधिका­यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.टी. खडपकर यांनी केले. तर हरिष खवणेकर यांनी आभार मानले.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन कुबल, विकास आरावंदेकर, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचितक यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Close Menu