शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नागरी कृती समिती ॲक्शन मोडवर

स्वच्छतेमध्ये नावलौकीक प्राप्त केलेले वेंगुर्ला शहर पालिकेच्या चाललेल्या धीम्या कारभारामुळे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. शहरात अनेक समस्या निर्माण झाल्याने जागरूक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत नागरी कृती समिती पुनर्जिवीत केली आहे. या समितीतर्फे विविध विकासकामांचा स्पॉट पंचनाम्यांवर भर देत कामांची झालेली परिस्थिती जनतेसमोर आणली जात आहे. शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करावी अशी मागणी नागरी कृती समितीने प्रशासनाकडे केली आहे.

      शहरात यावष मान्सनपूर्व कामे झालीच नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी एकत्र येत आवाज उठविला आहे. त्यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीनंतर समस्याग्रस्त नागरिकांनी आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवत या लढ्यात सहभाग घेतला आहे.

शहराची लोकसंख्या व रचना

      सन 2011च्या जनगणनेनुसार वेंगुर्ला शहराची लोकसंख्या ही 12  हजार 392 एवढी आहे. तर शहरात 17 वॉर्ड असून त्यात एकूण मालत्ताधारक 6 हजार 794 एवढे आहेत. त्यांची एकत्रित कर आकारणी मूल्य अंदाजे 1 कोटी 61 लाख एवढी आहे. या शिवाय राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागाचा शासकीय निधी नगरपरिषदेला तांत्रिक मंजूरीनंतर प्राप्त होत असतो.

अशा आहेत समस्या

      शहरातील 70 टक्के रस्त्यांवर लहान / मोठ्या आकाराचे खड्डे व भगदाडे, रस्त्यांच्या बाजूची दोन्ही गटारे व नाल्यांमध्ये स्वच्छता नसल्याने त्याच प्लॅस्टिक बाटल्या, सांडपाणी, चिखल व माती यांचा समावेश, चर्मकारवाडीत 90 लाखांपेक्षा जास्त खर्च करून केलेले नाल्याचे काम ख्ाराब दर्जाचे, सार्वजनिक शौचालये व मुतारी यांची वेळच्यावेळी देखभाल, दुरूस्ती व साफसफाई नसल्याने अस्वच्छता, मत्स्यविक्रेत्यांसाठी असलेले कोल्ड स्टोअरेज बंद स्थितीत, कोंडवाडा अनेकवर्षे बंदस्थितीत, घोडबांव गार्डन समोरील ईव्ही स्टेशन दुसऱ्याच दिवशी बंद, किनळेवाडी रस्त्याची दुरावस्था, ई-पे टॉयलेट बंद, तांबळेश्वर व दाडाचे टेंब येथील इलेक्ट्रीक शवदाहिन्या अकार्यान्वित, घोडेबांव गार्डनमधील हॉटेल बंदावस्थेत, काही भागात स्ट्रीट लाईट बंदावस्थेत, डास निर्मुलनासाठी आवश्यक असलेली फॉगींग मशिन बंदावस्थेत.

केलेल्या मागण्या

      नागरिकांच्या हितासाठी नागरी कृती समितीने काही मागण्या केल्या यामध्ये प्रामुख्याने वेंगुर्ला नगरपरिषदेला मिळालेल्या 17 कोटी बक्षिस रक्कमेचा कसा व कुठे विनियोग केला, त्यातील शिल्लक रक्कम किती आहे याचा तपशील मिळावा, शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग भवन उपलब्ध व्हावे, न.प.मार्फत बांधकाम सुरू असलेल्या गटारात पडून पाय काढावा लागलेल्या निसार शेख याला नुकसान भरपाई म्हणून 10 लाख देण्यात यावेत, शिवाजी प्रागतिक शाळेची इमारत निर्लेखित करावी, वडखोल भागातील विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील काही घरांवर क्युआर कोड लावण्यात आले आहेत. हे 20 टक्केच झाले असून 80 टक्के काम बाकी राहिले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई व्हावी यांसह 15 ऑगस्ट 2025 पूव ग्रामसभेप्रमाणे नगरपरिषदेची नगरसभा आयोजित करण्यात यावी, आदी मागण्या कृती समितीने प्रशासनाकडे केल्या आहेत.

Leave a Reply

Close Menu