उज्जयनी मांजरेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

रा.कृ.पाटकर हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका उज्जयनी नारायण मांजरेकर या ३० जून रोजी नियतवयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाल्या. त्याबद्दल वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्यावतीने त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.

      मठ येथील डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन जयप्रकाश चमणकरदाभोली स्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकरमठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल जाधवडॉ.सातोसकरशिक्षक समिर पेडणेकरगणुराज गोसावीरेश्मा सातोसकरसविता जाधवमनिषा जंगलेस्वप्नाली कांबळीअतुल वाढोकरअनिकेत कांबळे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना उज्जयनी मांजरेकर यांनी आपल्या सेवाकाळात सर्वांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्व सहका-यांचे तसेच जयप्रकाश चमणकर आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आठवण काढत कै. सुधाकर तावडे यांचे आभार मानले. श्रीमती मांजरेकर यांनी सर्वांना भेटवस्तू प्रदान केल्या. यावेळी पाटकर हायस्कूलमठ हायस्कूल व दाभोली हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Close Menu