श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व टांककर शेटये ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालय व बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयामधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व मोफत पुस्तकाचे वितरण करण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय यांनी करिअर गाईडन्स पुस्तकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या पुस्तकाच्या आधारे करिअर निवडताना कोणतीही समस्या जाणवल्यास देवस्थान आपणास सदैव सहकार्य करेल असे जाहीर केले. टांककर शेटये ट्रस्टचे अध्यक्ष बाबा शेटये यांनी करिअर दिशा निवडताना आणि निवडल्यावर विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या निमार्ण झाल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले. दरम्यान, विश्वस्त डॉ.प्रसाद प्रभूसाळगांवकर व मुख्याध्यापक मंगेश उर्फ आबा कांबळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनोद पेडणेकर, चव्हाण सर, बागवे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा.डॉ.श्रीराम दिक्षित यांनी केले.