माजी मंत्री रविद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर १ जुलै रोजी वेंगुर्ला भाजपातर्फे कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, राजन गिरप, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, प्रणव वायंगणकर, हेमंत गावडे, राहूल मोर्डेकर, शरद मेस्त्री, शितल आंगचेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.