सिधुदुर्गच्या सर्व भागात रोटरी क्लब समाजातील गरजू लोकांसाठी सर्वोत्तम सेवाभागी कामगिरी बजावत आहेत. अशाप्रकारच्या सेवांसोबतच जगातून पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी नूतन वर्ल्ड पोलिओ चेअरमन व रोटरी डायरेक्टर के.पी.नागेश यांच्या प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी सिद्ध होऊया असे आवाहन पदग्रहण अधिकारी नासीरभाई बोरसादवाला यांनी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी केले.
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या नूतन पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा २५ जून रोजी वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपिठावर पदग्रहण अधिकारी व माजी प्रांतपाल नासीरभाई बोरसादवाला, रटरीचे अध्यक्ष योगेश नाईक, सेक्रेटरी अॅड.प्रथमेश नाईक, ट्रेझरर मुकूल सातार्डेकर, नूतन असिस्टंट गर्व्हनर डॉ.प्रशांत कोलते, ड्रिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, नूतन प्रेसिडेंट आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ.राजेश्वर उबाळे, ट्रेझरर अनमोल गिरप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सचिन पालव यांच्या गणेशवंदनाने झाली. पालव यांच्या संगीत क्षेत्रातील उज्ज्वल यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात माजी अध्यक्ष योगेश नाईक यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आढावा घेऊन वेंगुर्ला तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी खेळाडूंसाठी फर्स्टएड मेडिकल किट सुपूर्द केले. तसेच, वेंगुर्ला रोटरी सेवा केंद्राला गरजू रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या ४ फाऊलर बेड देत असल्याचे जाहीर केले. सेक्रेटरी अॅड. प्रथमेश नाईक यांनी रोटरी क्लबच्या सन २०२४-२५ चा कार्यवृतांत सादर केला. यानंतर नासीरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनचे २०२५-२६ रोटरी वर्षासाठी नुतन प्रसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर व बोर्ड ऑफ डायरेक्टर, विविध समिती चेअरमन, पदाधिकारी आणि नुतन सदस्य रंजन पडते व स्वप्निल झांटये यांचे रोटरी पीन देऊन स्वागत करण्यात आले.
नासिरभाई बोरसादवाला यांची झोन सेव्हनचे एंड पोलिओ को- ऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल वेंगुर्ला व सिधुदुर्ग रोटरीतर्फे शाल, श्रीफळ, नंदादिप व सन्मानचिन्ह देऊन रोटेरियन आनंद बोवलेकर, राजन शिरोडकर, राजन बोभाटे, रविद्र परब, सुहास ओरोसकर, राजेश घाटवळ, डॉ.प्रशांत कोलते, दिलीप गिरप, संजय पुनाळेकर व योगेश नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नुतन प्रेसिडेंट आनंद बोवलेकर यांनी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर अरूण भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेण्याचे जाहीर केले. नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यासाठी देवगड, खारेपाटण, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, मालवण, कुडाळ, शिरोडा, सावंतवाडी व बांदा येथील रोटेरीयन उपस्थित होते. डॉ.प्रशांत कोलते महत्त्वाच्या डिस्ट्रिक्ट प्रोजेक्टबद्दल मार्गदर्शन केले. तसेच खारेपाटण क्लबला मोफत वैद्यकीय साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे तसेच नासीरभाई बोरसादवाला यांनी वेंगुर्ला रोटरी क्लबला पाच व्हीलचेअर देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विविध परिक्षांतील शाबद्दल रोटरी क्लबच्या रोटरियन पाल्यांना पालकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच जय मांजरेकर यांनी वीसवेळा रक्तदान करून लोकांचे जीव वाचविल्याबद्दल, विनिता तांडेल यांच्या उत्कृष्ट रूग्णसेवेबद्दल, विशाल चेंदवणकर यांच्या चांगल्या वीजसेवेबद्दल, फॅशन शोमधील चार्मिग मिस इंडिया म्हणून निवड झाल्याबद्दल किरण मेस्त्री, बॉडीबिल्डर मंगेश गावडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम आल्याबद्दल तसेच नासीरभाई बोरसादवाला, राजेश घाटवळ, डॉ.प्रशांत कोलते, इनरव्हिल अध्यक्षा अपर्णा बोवलेकर, नुतन गर्व्हनर एरिया डॉ.विद्याधर तायशेटे, नुतन असिस्टंट गर्व्हनर सचिन मदने व विनया बाड यांनाही सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन नितीन कुलकर्णी यांनी, पाहुण्यांची ओळख प्रा.वसंतराव पाटोळे व पंकज शिरसाट यांनी केली. तर डॉ.राजेश्वर उबाळे यांनी आभार मानले.