वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.के. जी.केळकर यांची कन्या पद्मा केळकर हिने मे २०२५ मध्ये गोवा विद्यापिठाने गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र शिरोडा-गोवा येथे घेतलेल्या चौथ्या वर्षाच्या बीएएमएस (आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया पदवी) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गोवा विद्यापिठात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अध्यक्ष अॅड.नरेंद्र सावईकर, सचिव बखले, प्राचार्य डॉ.निलेश कोरडे, माजी प्राचार्य डॉ.अनुरा बाळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.