पर्यटनदृष्ट्या विकसित असलेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निवांता हॉस्पिटॅलिटीतर्फे ‘स्वच्छ सिधुदुर्ग घोषवाक्य‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वेंगुर्ला-दाभोली येथील विलास हरमलकर यांनी प्रथम, साळगांव येथील प्रेरणा घाग हिने द्वितीय तर मडगांव-गोवा येथील तनुजा सगरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या विलास हरमलकर यांना ‘निवांता सुरंगी कोकणी होम‘ आसोली-वेंगुर्ला येथे दोन व्यक्तींसाठी दोन रात्रींचा जेवणांसहित मुक्काम, प्रेरणा घाग यांना ‘सुरंगी‘ आणि ‘निवांता‘ टी-शर्ट, कॅप कंपनीचे चविष्ट स्नॅक्स, २० टक्के सवलतीमध्ये ‘निवांता कोकणी होम्स‘मध्ये २०२५ या वर्षभरात कधीही मुक्कामाची संधी, तर तनुजा सगरे यांना ‘निवांता‘ टी-शर्ट, कॅप कंपनीचे तसेच कोकणी स्नॅक्स, १५ टक्के सवलतीमध्ये ‘निवांता कोकणी होम्स‘मध्ये २०२५ या वर्षभरात कधीही मुक्कामाची संधी उपलब्ध झाली आहे.