वेंगुर्ले ग्राहक पंचायत अध्यक्षपदी आनंद बांदेकर

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून डॉ. आनंद प्रभाकर बांदेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वेंगुर्ले रामघाट येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, संघटक विष्णुप्रसाद दळवी, महिला सहसंघटिका श्रीमती रिमा भोसले, सहसचिव सुगंधा देवरुखकर, कोषाध्यक्ष संजय पाटील आणि सल्लागार ॲड. समीर वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, प्रा. डॉ. सचिन परुळकर, प्रा. डॉ. गोविंद धुरी, अंकिता बांदेकर, मंजुषा आरोलकर, सुनील रेडकर, नामदेव सरमळकर, महेश राऊळ, महेंद्र घाडी, विकास वैद्य, हेमंत गावडे, संजय पिळणकर, राजन भोसले आणि सावंतवाडी अध्यक्ष अमोल केसरकर आदी उपस्थित होते. अध्यक्षपदी डॉ. आनंद बांदेकर, सचिवपदी सुनील रेडकर, उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. सचिन परुळकर, तालुका संघटकपदी महेश राऊळ, सहसंघटकपदी महेंद्र घाडी, सहसंघटक महिलापदी मंजुषा आरोलकर, सहसचिवपदी हेमंत गावडे, कोषाध्यक्षपदी प्रा. डॉ. गोविंद धुरी, प्रसिद्धी प्रमुखपदी संजय पिळणकर, सल्लागारपदी डॉ. संजीव लिंगवत, सदस्यपदी श्रीमती अंकिता बांदेकर आदींची निवड झाली.

Leave a Reply

Close Menu