वेंगुर्ला तालुकास्कूलचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन शालेय जीवनात शिक्षक म्हणून लाभलेल्या शिक्षकांच्या घरी जात त्यांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना त्यांचे आशीर्वादही घेत आहेत. यावर्षी आबा खोत, मेघा पाटकर, मोहिनी पेडणेकर, वि.म.पेडणेकर, राजेंद्र बेहरे, आनंद पेडणेकर या शिक्षकांच्या निवासस्थानी जात त्यांना अभिवादन करीत त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी निखिल घोटगे, स्वप्निल पांडजी, स्वप्निल कोरगांवकर, राहूल मोर्डेकर, कुणाल नाईक, जितू सामंत, भैय्या गुरव, चेतन ठोंबरे, सोहम भगत, सुहास मांजरेकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.