शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम, राज्यात तृतीय व देशात पंधरावा क्रमांक प्राप्त केला आहे. याची दखल घेऊन उबाठा सेना वेंगुर्लातर्फे न.प.तील स्वच्छता कर्मचायांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. यावेळी उबाठाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संघटक सुकन्या नरसुले, माजी नगरसेविका सुमन निकम, तालुका महिला संघटक साक्षी चमणकर, नगरपरिषद अधिक्षक अभिषेक पाटील, माजी अधिक्षक संगीता कुबल, उभादांडा सरपंच निलेश चमणकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी, सूत्रसंचालन माजी नगरसेवक तुषार सापळे यांनी केले. आभार सुमन निकम यांनी मानले.