वालावलकर जयंती निमित्त डॉ.परांजपे यांचा सत्कार

भक्त श्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मणराव वालावलकर यांची ९५ वी जयंती डेवरवण येथील रूग्णालयात साजरी करण्यात आली.  गुरूंच्या कृपेने साधलेले सर्व यश स्वतःचे न मानता, संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण करणारे उदात्त व्यक्तिमत्त्व म्हणजे भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर हे होत. असे गौरवोद्गार वाराणसी येथील बनारस हिदू विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ बिंदा दत्तात्रय परांजपे यांनी काढले. डॉ. बिदा परांजपे यांचा रूग्णालयाच्या संचालिका डॉ.सुवर्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संचालिका शरयु यशवंतराव, क्रिडा संचालक श्रीकांत पराडकर, प्राचार्य तेजल सुर्वे, प्राचार्य चंद्रशेखर एल. आदी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी संस्कृत, स्पॅनिश, जर्मन आणि इंग्रजी भाषेमधून विद्यार्थ्यांनी भक्त श्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांच्या जीवनावर चरित्रावर भाषणे सादर केली. विविध भाषेतील उत्तम शब्द, उच्चार आणि सुंदर शैलीत सादर केलेली भाषणे ऐकून उपस्थित पाहूणे आणि प्रक्षक मंत्रमुग्ध झाले.

 

Leave a Reply

Close Menu