वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात गणेशोत्स नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरूळकर पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, वीज वितरणचे उपअभियंता इम्रान शेख, एसटी आगाराचे व्यवस्थापक राहूल कुंभार, वाहतूक पोलिस मनोज परूळेकर, सा.बां.विभागाच्या कनिष्ठ अभियंता दिव्या जांबळे यांच्यासह तहसीलदार प्रतिनिधी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, रिक्षा टेम्पो व्यावसायीक, व्यापारी, किरकोळ व्यापारी आदी उपस्थित होते. गणेशोत्सव कालावधीत फोर व्हीलर पार्किग व्यवस्था-गणेश कॉम्प्लेक्स, माणिकचौक, शाळा नं.१, सिद्धिविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, दाभोलीनाका, पाटील चेंबर्स, लता अपार्टमेंट, महालक्ष्मी कॉम्प्लेक्समधील मोकळी जागा, थ्री व्हीलर पार्किग-वेंगुर्लेकरवाडी, रामेश्वर मंदिर, मालवाहक तीनचाकी-सप्तसागर ते मारूती स्टॉप, टु व्हिलर पार्किग-सागररत्न मत्स्य बाजारपेठ, पवनपुत्र भाजी मंडई लोकमान्य टिळक वाणिज्य संकुल इमारतीचा तळमजला, वेंगुर्लेकरवाडी, सप्तसागर, रामेश्वर मंदिर, शाळा नं.१, शहरात येणाया ट्रॅव्हल्स मानसीश्वर उद्यानासमोरील व कॅम्प स्टेडियम शेजारील मोकळी जागा या ठिकाणी थांबतील.
दि.२५ व २६ रोजी माटवीचे साहित्य विक्री करणाया किरकोळ व्यापायांना रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात येणार आहे. या दोन दिवसांकरीता बॅ.खर्डेकर रोडवरील मारूती मंदिर ते दाभोली नाका या रस्त्यांवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सदरचे दोन दिवस वगळून टू व्हीलर वाहनांची नियमित वाहतूक, रिक्षांसाठी मुख्य बाजारपेठेत वन वे वाहतूक सुरू राहील. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर याच मार्गावरून चारचाकी वाहनांसाठी वनवे सुरू राहील. दि.२५ ते ८ सप्टेंबरपर्यंत येणाया एसटी वाहनांसाठी रामेश्वर मंदिर थांबा निश्चित करण्यात आला आहे.