‘हर घर तिरंगा‘बाबत नियोजन संपन्न

  ‘हर घर तिरंगा‘ अभियानाच्या नियोजन बैठकांची सुरूवात वेंगुर्ला तालुक्यातून करण्यात आली. त्याची माहिती देण्यासाठी येथील भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ‘हर घर तिरंगा‘ अभियानाचे जिल्हा संयोजक संदिप गावडे यांच्यासह विष्णू परब, प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, गणेश गावडे, आनंद गावडे, हेमंत गावडे आदी उपस्थित होते.

    दि.१० ते १४ ऑगस्ट या कालावधीत युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या पुढाकाराने बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या तिरंगा यात्रांमध्ये भारतीय लष्कराचा गौरव करणारे फलक असणार आहेत. दि.१३ ते १५ ऑगस्ट कालावधीत बूथवरील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा फडकविताना लहान मुलांना प्रोत्साहन द्यावे. दि. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात असणा­या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाजवळील परिसर तसेच स्वातंत्र्य लढ्यासंबंधित ठिकाणांच्या परिसरात स्वच्छता करून पुष्पांजली अर्पण करताना त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. प्रत्येक मंडलात स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र सैनिक, युध्दात शाहिद झालेले जवान, तसेच शहीद पोलीस कुटुंबियांची भेट घेवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभिषिका दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी कोणत्याही घोषणा न देता फक्त रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी फाळणीचे दुष्परिणाम भोगावे लागलेल्या कुटुंबियांच्या भेटी तसेच फाळणीचे दुष्परिणाम दर्शविणा­या छायाचित्रांचे प्रदर्शन, व्याख्यान आदी कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे श्री.गावडे यांनी स्पष्ट करून या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Close Menu