देवजी ट्रस्टतर्फे भेटवस्तूंचे वाटप

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या उभादांडा येथील लक्ष्मी शंकर देवजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. हा कार्यक्रम केपादेवी मंदिरात संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, ज्येष्ठ भजनी बुवा सावळाराम कुर्ले, उभादांडा ग्रामपंचायतीचे सदस्य नम्रता कुर्ले, राजन कुर्ले, भानुदास कांबळी, देवजी ट्रस्टचे सहसचिव हरिश्चंद्र गिरप, सल्लागार रामचंद्र देवजी, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, श्री. घाडी, सचिन ठाकरे आदी उपस्थित होते. लवकरच या ट्रस्टतर्फे समुद्र
किना­यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Close Menu