‘उत्कृष्ट महाविद्यालय‘ पुरस्कार निवड प्रक्रियेअंतर्गत मुंबई विद्यापिठाच्या पडताळणी समितीने ११ ऑगस्ट रोजी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला भेट देत शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक, विद्यार्थी कल्याण, सामाजिक बांधिलकी आणि पायाभूत सुविधांची पाहणी करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. या पडताळणी समितीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे)च्या माजी उफलगुरू डॉ. एन. एस.उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ.संजय चकाणे व बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणेचे प्राचार्य चंद्रकांत एन.रावल यांचा समावेश होता. या समितीने प्रयोगशाळा, संगणक केंद्र, वाचनालय, क्रीडांगण, सांस्कृतिक सभागृह, एनसीसी-एनएसएस विभाग, मुलींसाठी वसतिगृह आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, संशोधनातील प्रगती व समाजाभिमुख उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. समितीच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात असून ‘उत्कृष्टमहाविद्यालय‘ हा मानाचा दर्जा मिळण्याची अंतिम प्रक्रिया पार पडणार आहे.