आत्ता नाही … चतुथनंतर !!

सात वर्षांपूव मी पुणे सोडून तळकोकण आणि गोव्यात आले, तेव्हा श्रावण संपत आला होता. हिरवागार निसर्ग, क्षणात भरून येणारं आणि क्षणात उबदार ऊन पसरवणारं आभाळ बघून बालकवींच्या ‌‘श्रावणमासी हर्ष मानसी‌’ कवितेचा प्रत्यय ठायी ठायी येत होता. शहराच्या गजबजाटापासून दूर येऊन सलग असा निसर्ग अनुभवायची ही पहिलीच वेळ होती. भाद्रपद जवळ येऊ लागला आणि या हिरव्या-ओल्या निसर्गाला श्रद्धेची एक रंगीत किनारच आल्यासारखं वाटायला लागलं. बाजारात दुकानांच्या बाहेर रंगीत फुलांच्या आणि दिव्यांच्या माळा दिसायला लागल्या, वेगवेगळ्या प्रकारचे मखर दुकानांच्या बाहेरच्या बाजूला सजले, रंगीबेरंगी ओढण्या मिरवत बाजारपेठा सजल्या, तात्पुरती फटाक्यांची दुकानं थाटली गेली, तिथे मुलांची गद दिसू लागली आणि बाजारातले हे रंग हळूहळू लोकांच्या बोलण्यात दिसू लागले.

  कोकणात गणेश चतुथ ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांचा उल्लेख ‌‘चतुथ‌’ म्हणूनच केला जातो ही गोष्ट माझ्या सर्वात आधी लक्षात आली. हळूहळू समजलं, की हा इथला सर्वात मोठा सण, अगदी दिवाळीपेक्षाही मोठा! मी इथला गणेशोत्सवही अनुभवला नव्हता आणि दिवाळीही नाही, पण तरीही या नव्यानं प्राप्त झालेल्या माहितीवर माझा सहज विश्वास बसला कारण इथल्या लोकांच्या बोलण्यातून एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं की, सगळे बेत आणि कोणतंही नियोजन हे चतुथभोवती केलं जातंय. कुणालाही काहीही विचारलं, तरी ‌‘आत्ता, नाही चतुथनंतर!‌’ असं उत्तर यायचं. नवीन नोकरी, नवीन जागा असल्यानं काही अति महत्त्वाची कामं असली, तर लगेचच म्हणजे चतुथच्या आत आटपून घे. नाहीतर चतुथचे दहा दिवस कामं अडकून पडतील, असा सल्ला मला एकदोन जणांनी दिला. ही अति महत्त्वाची, तातडीनं करायची माझी कामंही झाली नव्हती. मला सगळ्यांकडून ‌‘चतुथनंतर काय ते बघू या..‌’ असंच उत्तर मिळालं होतं, याचं त्यावेळी नवल वाटलं होतं, पण आता नाही.

विविधरंगांनी सजलेल्या बाजारात फेरफटका मारताना वेगवेगळ्या, कधीही न बघितलेल्या फळांनी लक्ष वेधून घेतलं. माटोळीसाठीची ही खरेदी हे समजलं. गणपती हा सण पुण्यातसुद्धा उत्साहानंच साजरा केला जातो; पण इथले रंग, इथला उत्साह आणि या नवीन प्रथा समजत गेल्या आणि लहानपणापासून माझ्या मनात असलेली इच्छा परत उफाळून वर आली – आपल्याकडेपण गणपती हवा!

  गणपतीची आरास करणं, आदल्या दिवशी गणपती वाजतगाजत घेऊन येणं, चतुथच्या दिवशी केली जाणारी पूजा, प्राणप्रतिष्ठा केल्यावर खरोखरच तेजस्वी दिसणारा गणपती, मोदकांची गडबड, जोरजोरात म्हटलेल्या रोजच्या आरत्या या सगळ्याचं आकर्षण प्रत्येक लहान मुलीप्रमाणे मला आणि माझ्या मोठ्या बहिणीलाही होतं. आमच्या घरी गणपती बसत नव्हते म्हणून कदाचित जरा जास्तच! माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं, तेव्हा ‌‘त्यांच्याकडे दहा दिवस गणपती बसतो!‌’ हे आवर्जून सांगताना तिच्या बोलण्यात वेगळाच उत्साह असायचा. या सगळ्यात इथल्या उत्साही वातावरणानं भरच पाडली आणि मीही, “यंदापासून आपल्याकडेही बसवू या का गणपती?” असं एक पिल्लू सोडून बघितलं. सुरुवातीचा नकार सहज होकारात बदलवता येईल असा माझा नव्या नवलाईचा आत्मविश्वास होता. पण नंतर समजलं, की कोकणात विभक्त कुटुंबांचे वेगवेगळे गणपती शक्यतो बसवत नाहीत. सगळ्या कुटुंबाचा मिळून एकच मोठा गणपती. असा अनेक कुटुंबांचा मिळून एकच गणपती असला, तरीही त्याची तयारी मात्र प्रत्येक घरी स्वतंत्रपणे केली जाते. कुठे कुणी माटवीला बांधायला परसातली तवशी किंवा तोरींजन काढत असतो, कुणी दूर्वा-पत्री खुडण्यात व्यग्र असतो, कुणी दिव्यांच्या माळा जोडायचं काम करायला, त्या मूळ घरी ये-जा करत असतो तर एखादा कुणीही न सांगता स्वयंपाकसाठी लागणारं सामान त्या मूळ घरी हळूच पोहचवत असतं. हेवेदावे, वादविवाद कुणालाच चुकले नाहीत, पण अशा सणांना एकत्र येताना ते बाजूला सारणं ही खरी भक्ती हे जाणवलं. चतुथ साजरी करायला घरी गणपतीची मूत आणावीच लागते, असं नाही याची जाणीव झाली. मुंबईविषयी बोलताना कायम ‌‘मुंबई स्पिरीट‌’ असा एक उल्लेख केला जातो. मला वाटतं, इथे तसं ‌‘चतुथ स्पिरीट‌’ असतं.

  माझ्या पहिल्या वषच्या अनुभवानंतर मी सगळी महत्त्वाची कामं गणेशोत्सवाच्या आधी उरकून घ्यायला शिकले. दोन वर्षं झाल्यावर या सणाचा गणेशोत्सव असा लांबलचक उल्लेख न करता, इथल्याप्रमाणे ‌‘चतुथ‌’ असा सुटसुटीत उल्लेख करायला शिकले, तिसऱ्या वष चतुथत केल्या जाणाऱ्या करंज्या केल्या आणि माहेरी पाठवल्या. त्यावषच्या चतुथचा आनंद वेगळाच होता. अशी आता बरीच वर्षं गेली. चतुथचा उत्साह अंगवळणी पडला. परवा एकांचं माझ्याकडे काहीतरी काम होतं, तेव्हा पटकन बोलून गेले, “मी तुम्हाला जरा चतुथनंतर कळवते हां..” आणि जाणीव झाली की हे ‌‘चतुथ स्पिरीट‌’ आता हळूहळू आपल्यातही भिनायला लागलं आहे!

– मुग्धा मणेरीकर, 7397 469 390

Leave a Reply

Close Menu