तूृ सुखकर्ता तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया|
संकटरक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥
विघ्नहर्ता गणरायाची आळवणी करणाऱ्या या काव्यपंक्ती बरेच काही सांगून जातात. गणरायाची विनवणी करणाऱ्या आजच्या तरुणाईच्या मनात शंकेची पाल चुटपटत असते. खरोखरच गणपती भक्तांच्या हाकेला धावतो काय? अशावेळी एका जुन्या गीताची आठवण होते. ‘मनी नाही भाव अन् म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे॥’ असे असता गेल्या काही वर्षांपासून गणपती भक्तांना पावतो याची प्रचिती कित्येक भक्तांना येऊ लागली आहे, ती म्हणजे रेडीतील नवसाला पावणारा द्विभूजा गणपतीची. ही ख्याती दूरवर पसरू लागली आहे आणि भक्तमंडळींचे दर्शन दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
गणेश चतुथ हा तळकोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी साजरा केला जाणारा मोठा उत्सव. गणपती मूतचे वास्तव्य घरी दीड दिवस असले तरी झाडलोट, साफसफाई, रंगरंगोटी आदी प्राथमिक कामांना महिनाभर पूवपासून सुरूवात. माणसाच्या जीवनात-राहणीमानात बदल होत चालला आहे. त्याला विविध उत्सव साजरे करणाऱ्या चालीरिती-पद्घती ह्या अपवाद नाहीत. आमच्या बालपणात शिरोड्यात कै. बाबा सारंग, कै. भास्कर कावळे-शिरोडकर, कै. गणपत कामत, कै. कांबळी, कै. कुडव, आरवलीतील कै. येसजी, कै. पालयेकर, राणे आदींच्या गणपतीच्या चित्रशाळा होत्या. कै. बाबा सारंग यांच्या घराण्यातील पाचवी पिढी आज मूतकामात दंग दिसते. आजकाल गणेशभक्तांचा कल स्थानिक मातीच्या गणपती मूत ऐवजी पेणहून आणलेल्या मूतकडे वळू लागला आहे. तसे पाहिले तर शिरोडा दशक्रोशीत नवोदित कलाकारांच्या बऱ्याच गणपती मूतशाळा आजही कार्यरत आहेत. शिरोडा केरवाडा भागात मोठमोठ्या मूत विराजमान करण्याची जणू स्पर्धाच पहावयास मिळते. येथील मच्छिमार बांधवांच्या घरी अकरा ते एकवीस दिवस चतुथ साजरी केली जाते.
शिरोडा – आजगाव भागात अजूनही काही घरांनी सार्वजनिक गणपती मूत पूजन करतात. आजगाव भोमवाडीत कानजी, बाळे, निखार्गे ही घराणी एकत्रित उत्सव साजरा करतात. नव्या पिढीचे आम्ही ही जुनी परंपरा आजही जपतो आहे. शिरोडा गावी बस स्थानकाशेजारी कै. नामदेव परब तथा कांता मास्तर यांच्या घरी एकाच माटवीखाली मामा आणि भाचा यांचा गणपती अशा दोन मूत पहावयास मिळतात. शिरोडा पोलिस दूरक्षेत्रात गणपती मूत विराजमान करण्याची पूवपासूनची परंपरा अद्यापही चालू आहे.
कालमानपरत्वे गणपती शाळेमधून मूत घरी आणणे आणि विसर्जनास नेण्याच्या पद्धतीत बदल होत गेला आहे. मूत डोक्यावरून आणण्यापेक्षा चारचाकी आलिशान मोटारीतून गणराजाचे आगमन होते. मूत विसर्जनासाठी टेंपोचा वापर होत असून बेंजो, ढोलपथक तसेच कानठळ्या बसविणारे डॉल्बी यांचा वावर वाढू लागला आहे. सुट्या पेटाऱ्यांची जागा पाचशेची माळ, हजारांची माळ आणि हवेत उडणारे शॉटस् यांनी घेतली. काही वेळा दारुसामान कोणाचे जास्त ही स्पर्धा पहावयास मिळते. पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक असले तरी त्या त्या भक्तांची ती आवड असते, हौस असते. शिरोडा गावी देऊळवाडा, परबवाडा, बाजारपेठ, खासबागवाडा, नाबरवाडी, धानजीवाडा वगैरे वाड्यांमधील गणपती मूत विसर्जनापूव ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराकडे आणण्याची प्रथा आजही चालू आहे
– अनिल निखार्गे, ज्येष्ठ पत्राकार, शिरोडा, 9423301067