कॅम्प येथे वास्तव्यास असलेल्या ‘कातकरी‘ समाजाने यंदाही मोठ्या उत्साहात आणि यथाशक्ती पाच दिवस गणपतीचे पूजन केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विघ्नहर्त्यांचे पूजन करून गणेशाप्रती असलेली अपार श्रद्धा, आदर व भक्ती यांचे दर्शन हा कातकरी समाज घडवित आहे. लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून आपल्याला रहायला स्वतःची घरे द्यावीत असे साकडेही या समाजाने गणपतीला घातले आहे.