श्रीस्वामी समर्थांच्या प्रकट कार्यकालात घडलेल्या असंख्य घटनांमागे रहस्ये दडलेली आहेत. गेली एकोणतीस वर्षे या विषयीचे अभ्यासपूर्ण साहित्य गोळा करून शूर सेनानी वार्षिकांकात प्रसिद्ध केले जात आहे. यंदा या अंकात अशा प्रकारचे अनेक लेख समाविष्ट केले जातील.
1) पंढरपूरमध्ये श्रीस्वामी राहात होते ते स्थळ सापडले.
2) श्रीस्वामीशिष्य दत्तगिरींचे तपस्या स्थान – नागिणीचा खडक व चंदगडमधील श्रीपाद वाडीतील पंच-पादुका स्थान.
3) श्रीस्वामींच्या समाधीलीला प्रसंगाआधी नागणहळ्ळीला पाठंगुळीवर उचलणारे अक्कलकोटचे सखाराम लोखंडे.
4) पंढरपूर-मंगळवेढा दरम्यानच्या आंबेग्रामी श्रीस्वामी गेले होते त्या स्थानावर जाण्यामागचे कारण उलगडले!
5) 1807च्या गोण्णागर यज्ञावेळी उकळत्या आमटीत पडलेल्या भक्ताला श्रीस्वामींनी जीवदान दिले त्या यज्ञदत्त घराण्याचा शोध!
6) तपस्वी लक्ष्मणमहाराज भापकर – श्रीस्वामींनी अक्कलकोटात असे किती हत्ती सुईच्या नेढ्यातून घालविलेत! स्वल्प जीवनचरित्र.
7) गुमास्तेंचा विठ्ठल, जिथे श्रीस्वामी जात असत!
8) श्रीस्वामीदास महारूद्ररावांचे चतुर्थ पुत्र – माधवानंदस्वामी जीवन काल.
9) आनंदनाथ लिखित श्रीस्वामींच्या श्रीगुरुस्तवनाचा शब्दार्थांसह भावानुवाद.
10) श्री आनंदनाथगुरु व दामोदर भारती मठाची हकिकत!
11) श्रीस्वामीभेटीस अक्कलकोटी आलेले क्रांतीसूर्य रंगो बापूजी गुप्ते देशपांडे तथा ब्रह्मानंद महाराज जीवन चरित्र.
12) श्री शंकरमहाराजांनी स्वतः रचिलेल्या व आपल्या भक्ताकरवी रचिलेल्या रचना व त्यातील गूढार्थ वर्णन.
13) मंगळवेढ्याचे श्रीस्वामीशिष्य बाळकृष्णमहाराज व पंढरपूरचे हुंडीवाले कोकणे.
यासारख्या अनेकानेक विषयांची सचित्र मांडणी भक्तांना भारावून टाकणारी असेल. श्रीस्वामी समर्थ व श्री शंकरमहाराज यांच्याविषयी अनोखी सखोल माहिती ही भक्तांच्या संग्रहात बहुमोल भर टाकतील. ही शूर सेनानी – श्रीस्वामीविशेषांक 2025ची वैशिष्ट्ये असून समस्त भक्तगणांनी ती आपापल्या मित्रगणांपर्यंत जरूर पोचवावी. अंक दिवाळीआधी प्रकाशित होईल. त्याआधी भक्तांपर्यंत पोहोचेल.
शूर सेनानी 2025, मूल्य 300/- रुपये + 60 पोस्टेज.
अंकासाठी संपर्क – प्रज्ञा तांबे – 9967756497
व्हॉट्सॲप संपर्क – 9869111850