जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत “दिव्यांग समता सप्ताह’ साजरा करण्यात आला. यानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात गटसाधन केंद्र आणि वेंगुर्ला शाळा नं.1 यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रारंभी शाळेतील दिव्यांग विद्याथ्र्यांचे स्वागत विस्तार अधिकारी कोनकर यांनी केले. गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, गटसाधन केंद्राचे कर्मचारी यांनी रॅलीमध्ये सहभाग दर्शविला. विद्याथ्र्यांनी रॅलीमध्ये दिव्यांगांच्या हक्कांबाबत घोषणा देत जनजागृती केली. या सप्ताह कालावधीत “प्रशस्तअॅप’ संदर्भात शिक्षकांसाठी एक विशेष कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यशाळेमुळे दिव्यांग विद्याथ्र्यांच्या मुल्यांकन आणि शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होणार आहे.
