न्यायव्यवस्थेत काम करताना अनेक जबाबदा¬या, आव्हाने आणि भावनिक ताणतणावांना समर्थपणे सामोरे जाणा¬या
महिला वकिलांच्या प्रवासाला शब्दबद्ध करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने “एका स्त्री वकीलचा घरापासून कोर्टापर्यंतचा भावनिक प्रवास’ यावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी राज्यभरातून 26 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. यात प्रथम-अॅड.गायत्री दिलीप मालवणकर (कणकवली), द्वितीय-अॅड.प्राजक्ता अजित शिरोडकर (कुडाळ), तृतीय-अॅड.अंजली विवेक मुतालिक (कुडाळ), उत्तेजनार्थ-अॅड.पवित्रा प्रसाद धुरी (सावंतवाडी) आणि अॅड. प्रणिता भक्तराज राऊळ-कोटकर (कोचरा) यांनी क्रमांक पटकाविले. निबंधांचे परीक्षण डॉ.सचिन परूळकर आणि डॉ.जी.पी.धुरी यांनी केले. विजेत्यांना अश्वमेध महोत्सवात गौरविण्यात येणार आहे.
राज्यातील महिला वकिलांनी आपल्या लेखनकौशल्याला आणि अनुभूतींना व्यासपीठ देण्यासाठी अशा साहित्यिक उपक्रमात पुढे येत रहावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी केलेे.
