वेंगुल्र्यातील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

वेंगुर्ला येथील विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी आपल्या भाषणात विद्याथ्र्यांना आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा दिली. तसेच स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक जिल्ह्राला सहभागी होणार असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या.
वेंगुर्ला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये 9 डिसेंबरपासून सुरू झालेल्या 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप 10 डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी व्यासपिठावर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेचे परीक्षक तथा बॅ.खर्डेकर कॉलेजचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.धनश्री पाटील व शिक्षक वीरधवल परब, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष किशोर सोन्सुरकर, पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत धुरी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात एकापेक्षा एक विज्ञान प्रतिकृती सादर करून विद्याथ्र्यांनी आपली संशोधनवृत्ती दाखवून दिली.
विज्ञानाच्या सहाय्याने आपण शाश्वत विकास घडविणे आवश्यक असल्याचे प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी सांगितले. तर खूप कष्ट घेऊन ज्ञानाचा वापर करून विद्याथ्र्यांनी प्रतिकृती केल्या आहेत. फक्त प्रदर्शनाच्या निमित्तानेच शोध घेऊन मॉडेल्स तयार करावे असे नाहीतर जीवनात सदैव आपणास संशोधनाची गरज सर्वच क्षेत्रात लागत असते म्हणून विद्याथ्र्यांनी संशोधनालाही महत्त्व द्यावे असे वीरधवल परब म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मनिषा खरात यांनी तर आभार प्रा.विलास गोसावी यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu