डॉ.नेहा आरोलकर हिने प्राप्त केली पी.एच.डी. पदवी

 वेंगुर्ला-भटवाडी येथील विद्यार्थीनी डॉ.नेहा महेंद्र आरोलकर हिने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ येथून डॉ.जी.एम.वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली “भाजीपाला विज्ञान’ या विषयात पी.एच.डी मिळविली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
नुकताच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ परभणीचा 27वा पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या समारंभाप्रसंगी कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवरत, प्रतिकुलपती तथा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ.मंगला राय, परभणी विद्यापिठाचे कुलगुरू प्रा.डॉ.इंद्र मणि यांच्या उपस्थितीत डॉ.नेहा हिला पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी देशभरातील अनेक नामांकित वैज्ञानिक आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.
डॉ. नेहा हिचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला नं.3, दहावीपर्यंतचे शिक्षण वेंगुर्ला हायसकूल, महाविद्यालयीन शिक्षण बॅ.खर्डेकर महाविद्यालयामध्ये तर बीएससी अॅग्रीकल्चरचे शिक्षण मुळदे येथील फलोत्पादन महाविद्यालयात झाले. तसेच पंजाबराव देशमुख महाविद्यालय अकोल्यामधून एम.एस.सी. तर आता वसंतराव नाईक विद्यापिठ परभणीमधून पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

Leave a Reply

Close Menu