तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रसाद खडपकर प्रथम

नगर वाचनालय, वेंगुर्ला आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रसाद खडपकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा 14 डिसेंबर रोजी वेंगुर्ला नगर वाचनालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या स्पर्धेला गंगाराम गवाणकर यांची कोणतीही साहित्यकृती हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेत कु. साध्वी मिंडे हिने द्वितीय तर विशाखा वेंगुर्लेकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्रसाद खडपकर यांनी “वात्रट मेले’ तसेच साध्वी मिंडे आणि विशाखा वेंगुर्लेकर यांनी “संगीत विठ्ठल विठ्ठल’ या पुस्तकावर परीक्षण केले. तिनही विजेते 20 डिसेंबर रोजी होणा-या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते राजेश शिरसाट यांनी पुरस्कृत केलेली पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, स्पर्धेचे परीक्षक महेश बोवलेकर, कैवल्य पवार, माया परब तसेच मयुरेश सौदागर आणि वाचक उपस्थित होते. अनिल सौदागर यांनी स्पर्धेच्या परीक्षणाविषयी माहिती देऊन जिल्हापातळीवर यशस्वी होण्यासाठी स्पर्धकांना मार्गदर्श केले.

Leave a Reply

Close Menu