नगरपरिषदेतर्फे दिव्यांगांना अनुदान वाटप

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पाच टक्के दिव्यांग राखीव निधीतून ७९ लाभार्थ्यांना साडेसात लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण नगराध्यक्ष दिलीप गिरपउपनगराध्यक्ष अस्मिता राऊळमुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

      दिव्यांग निधी अनुदानाचे वाटप दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात करण्यात येते. तसे ते फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते. मात्रत्यानंतर आता पुढील फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणा-या अनुदानाचे वाटप कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्याने दिव्यांग बांधवांना आर्थिक अडचण भासू नये यासाठी लवकर देण्यात आले. वेंगुर्ला शहरातील ७९ दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या दिव्यांगाच्या स्वरुपानुसार प्रत्येकी सहा ते आठ हजार या प्रमाणे सुमारे साडेसात लाखाचे वितरण करण्यात आले

Leave a Reply

Close Menu