स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव राबविला जात आहे. या स्वराज्य महोत्सव अंतर्गत शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ला हायस्कूल, हॉस्पिटल नाका, बाजारपेठ, दाभोली नाका, जुना एस.टी.स्टॅन्ड, पिराचा दर्गा, पॉवर हाऊस, वेंगुर्ला हायस्कूल अशी ही सायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशांत आपटे, कृपा गिरप, वेंगा बॉयसचे सर्व मेंबर्स, वेंगुर्ला हायस्कूल, मदर तेरेसा स्कूल, पाटकर हायस्कूल, शाळा नं.४चे शिक्षक व विद्यार्थी, नगरपरिषद कर्मचारी, डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. प्रल्हाद मणचेकर, नित्यानंद आठलेकर, सुरेंद्र चव्हाण, जयराम वायंगणकर, तालुका क्रीडा केंद्राचे प्रशिक्षक जयवंत चुडनाईक व संजीवनी परब, तसेच वेंगुर्लेतील सायकल प्रेमी, नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.