सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने देवगड-सडा येथे रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. रक्तदान शिबिर आणि त्याच ठिकाणी डॉ.सुनिल आठवले मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. हे संपूर्ण कार्यक्रम प्रसिद्ध उद्योगपती व दानशूर व्यक्तिमत्व बाबू सावंत यांच्या सौजन्याने होणार आहे. त्याच दिवशी त्याच ठिकाणी जिल्हा महासंघाने काढलेल्या सन २०२३ च्या कॅलेंडरचे अनावरणही केले जाणार आहे.
तसेच भंडारी समाजातील कुटुंबांची जनगणना कार्यक्रमाचा शुभारंभ याच ठिकाणी करण्यात येणार आहे व तालुक्यातील भंडारी समाजाचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. महासंघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, तालुक्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच समाजबांधव यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले आहे.