स्वयंसेवकांनी गिरविले व्यक्तिमत्व विकासाचे धडे

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर २२ ते २८ डिसेंबर कालावधीत परबवाडा गावात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते माई परब यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करून करण्यात आले. स्वयंसेवकांनी मनापासून काम करावे आणि माणुसकी जपावी असे आवाहन बांदेकर यांनी केले. या शिबिरामध्ये योगासने, प्राणायाम, श्रमदान, उद्धबोधन, खेळ, सांस्कृतिक, आर्थिक सर्वेक्षण आदी कार्यक्रम घेण्यात आले. कणकेवाडी येथे स्वयंसेवकांनी प्रमोद नाईक, जीवन परब, विश्वास पवार, नाना राऊळ यांसह अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारा बांधला. प्रा.वैभव खानोलकर यांनी ग्रामीण समाज आणि युवकाची भुमिकायावर विशेष मार्गदर्शन करताना भरकटत जाणा­या युवापिढी बद्दल तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार असल्याची तर ग्रामीण भागातील विविध समस्यांचा आढावा घेताना अंधश्रद्धा, अज्ञान, अप्रगत शेती, वाढणा­या व्यसनांचे प्रमाण, घटस्फोटांचे प्रमाण, लव्हजिहाद, प्रेमाचे आकर्षण, त्यातून वाया जाणारी तरुणाई, मोबाईलचे वेड, आत्मविश्वासाचा अभाव, भौतिक सुखासाठी चुकीचा मार्ग निवडणे, राजकारण्यांकडून युवाईची होणारी गळचेपी, बेकारीतून आपले भवितव्य आपल्याच हाती असल्याची जाणिव करून दिली. डॉ.स्वप्नाली पवार, चव्हाण, अॅड.सागर ठाकूर, वनक्षेत्रपाल सी.एच.जगदाळे, संदिप परब आदींनी विविध विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

       या शिबिराचा समारोप २८ डिसेंबर रोजी सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, सदस्य संतोष सावंत, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, सुहिता हळदणकर, हेमंत गावडे, अरुणा गवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल परब, संजय मळगांवकर, गजानन सावंत, धनश्री सावंत, उदय सावंत, रवी परब, सुमेधा सुर्वे, शिवराम परब, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, सदस्य प्रा.एल.बी.नैताम, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.एस.के.जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी मोहन मोबारकर व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत झाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून व्यक्तिमत्व विकास, शिस्त, सामाजिक आपुलकी, श्रमदान, कौशल्य विकास या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजतात अशी माहिती प्राचार्य देऊलकर यांनी दिली. तर रवी परब यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव स्वयंसेवकांना सांगितले.कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.व्ही.सावंत यांनी सूत्रसंचालन, प्रा.व्ही.एस.चव्हाण यांनी प्रास्ताविक तर आभार प्रा.एस.जी.चुकेवाड यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu