कॅम्प येथील महिला काथ्या कारखान्याच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रविणा खानोलकर, श्रुती रेडकर, अरुणा सावंत, अश्विनी पाटील, अरुणा परब, शिवण्या चिचकर, वासंती गांवकर, कमल तोडकर यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. आज महिला शिक्षण, सहकार, उद्योग, सैन्य, संशोधन अशा अनेक क्षेत्रात पुढे आहेत. याचे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना. त्या स्वतः शिकल्या आणि मुलींना शिक्षित करण्याचे काम सुरू केले म्हणूनच आजची महिला आघाडीवर आहे. असे असताना आजही सावित्रीबाई फुले यांच्याबाबत नकारात्मक चर्चा केली जाते हेच दुर्देव असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव प्रज्ञा परब यांनी व्यक्त केली.