कलाकार घडविण्यासाठी कलावलयचे महत्त्वाचे योगदान-देविदास आमोणकर

कलावलय वेंगुर्लेने वेंगुर्लासारख्या ग्रामीण भागात सलग २६ वर्षे एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाकारांना घडविण्याचे काम केलेले आहे. स्पर्धा भरविणे हे किती कठीण असतेहे मला जेष्ठ नाट्यकर्मी असल्याने माहिती आहे. या स्पर्धांना मुंबईसोलापूरसांगलीडोंबिवलीकोल्हापूररत्नागिरी व सिंधुदुर्गातील कलाकारांनी सहभाग घेत आपली कला वृद्धींगत करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कलेस रसिका श्रोत्यांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. कारण वर्षभरातून राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा एकदाच होतात व संपूर्ण वर्षभर नवीन कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत नाही. एकांकीका स्पर्धा या कलाकारान्ंाा घडविण्याचे काम करतात. त्यामुळे कलावलय वेंगुर्ला संस्थेचा कलाकारांना घडविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून योगदान आहे. असे प्रतिपादन गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी देवीदास आमोणकर यांनी वेंगुर्लेत प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले.

      वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय नाट्यसभागृहात आयोजित केलेल्या प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उदघाटन गोव्यातील जेष्ठ नाट्यकर्मी देवीदास आमोणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांत कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकरया उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परीतोष कंकाळपरीक्षक ज्ञानेश मुळेरविदर्शन कुलकर्णीसामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकरमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरपस्विटी यरनाळकर यांचा समावेश होता.

      या स्पर्धेसाठी उपस्थित अन्य मान्यवरातं संतसाहित्याचे गाढे अभ्यासक अॅड. देवदत्त परूळेकरमुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकरमाजी नगराध्यक्ष सुनिल डुबळेकलावलय वेंगुर्लेचे उपाध्यक्ष संजय पुनाळेकररोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल रेडकरपॉवर लिफ्टर अनुजा तेंडोलकरकलावलय वेंगुर्लेचे दाजी परबदिनेश तानावडे प्रदीप कुबलविनोद वरसकरभाई वायंगणकरबापू वेंगुर्लेकरचतुर पार्सेकरप्रसाद जोशीतरूण भारतचे उपसंपादक महेंद्र मातोंडकरतसेच पंकज शिरसाटभानुदास मांजरेकरलोकेश शिरसाटजितेंद्र वजराटकर याचा समावेश होता.

      यावेळी व्यासपिठावरील मान्यवरानी कलावलय वेंगुर्ले संस्थेने तरूण नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सलग २६ वर्षे केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल गोरोवोद्गार काढले.

      कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर यांच्या हस्ते गोव्यातील जेष्ठ नाटयकर्मी देवीदास आमोणकरनगरपरीषदेचे मुख्याधिकारी पारतोष कंकाळसामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकरपरीक्षक ज्ञानेश मुळेरविकिरण कुलकर्णीमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरपस्विटी यरनाळकर यांचा शालश्रीफळशाल व पुष्प असलेले रोपटे प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे पास्ताविक कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर यानी तर सुत्रंचालन किरात साप्ताहिकच्या संपादिका सिमा मराठे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu