स्वच्छतेमध्ये बालचमु उचलताहेत खारीचा वाटा

शहर स्वच्छ करण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा असा हेतु असलेल्या भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूंनी वेशी भटवाडी ते इंद्रधनू पार्क पर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे वेंगुर्ला शहरात स्वच्छतेची पाळेमुळे खोलवर रुजली गेली असल्याचा प्रत्यय नूतन वर्षाच्या प्रारंभी दिसून आला.

      देशभरात सन 2017 मध्ये स्वच्छता मोहिम सुरु झाली असली तरी 2015 पासूनच ‘वेंगुर्ला आणि स्वच्छता’ हे समिकरण दिसत आहे. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ हे ब्रीद रुजविण्यासाठी ‘नको दंड, नको शिक्षा-स्वच्छ वेंगुर्ला हिच अपेक्षा’ हे धोरण स्वीकारून नगरपरिषदेने वेळोवेळी विविध उपक्रमही राबविले आहेत. त्यामुळे शहरातील लहान मुलांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजले असून ती सुद्धा या स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रीय होत आहेत. दरम्यान, नुतन वर्षाचे स्वागत करताना या बालचमुने स्वच्छतेसारख्या अभिनव उपक्रमाला प्राधान्य देत वेशी भटवाडी ते इंद्रधनू पार्कपर्यंत स्वच्छता मोहिम राबविली. यात चैतन्य केसरकर, चिन्मय मराठे, ईशिता माईणकर, यश्‍मित सातार्डेकर, केतकी आपटे, चिन्मय पेडणेकर, कृत्तिका माईणकर, यशश्री केसरकर, तन्मय सातार्डेकर, हर्षल परब, वेदांत सातार्डेकर, सानिका पेडणेकर, भूमिका परब, सानिका वरसकर, अमिषा आडणेकर, संजना पेडणेकर, चिन्मयी पेडणेकर, काजल निकम, गौरव सातार्डेकर, गितेश वरसकर, गौरव वरसकर, अक्षय पेडणेकर या लहान मुलांनी सहभाग घेतला. या सर्वांना बिपिन वरसकर, लक्ष्मण केसरकर, राघोबा केसरकर, प्रविण सातार्डेकर, प्रशांत आपटे, सुनिल नांदोसकर, रोहन नांदोसकर, निलेश भगत, नारायण पेडणेकर, अशोक पेडणेकर, विनोद वरसकर यांचे तसेच नगरपरिषदेचेही सहकार्य लाभले. यापुढेही टप्याटप्प्याने स्वच्छता मोहिम राबविणार असून त्यावेळी नगरपरिषदेचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली. दरम्यान, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी या स्वच्छता मोहिमेला भेट देऊन लहान मुलांचे कौतुक केले. आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी एकत्र येत दररोजच्या अभ्यासातून वेळ काढत किल्ले, आकाशकंदील, नरकासूर, सायकल सफर, क्रिकेट स्पर्धा यासह अन्य मनोरंजनात्मक उपक्रम बाल गणेश मित्रमंडळ राबवित आहेत. त्याला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  

Leave a Reply

Close Menu